अमरावतीत ‘अंदाज-ए-लता’ विशेष संगीत कार्यक्रमाचे आयोजन
अमरावती (आरएनआई) भारताची गानकोकिळा स्व. लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त स्वर साधना म्युझिकल ग्रुपतर्फे “अंदाज-ए-लता” या विशेष इन-हाऊस कन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम रविवार, 28 सप्टेंबर 2025 रोजी सहयोग अपार्टमेंट, एमआयडीसी कॉलनी, अमरावती येथे होणार असून संगीतप्रेमींसाठी हा एक आगळावेगळा अनुभव ठरणार आहे.
या कार्यक्रमात प्रख्यात संगीततज्ञ, प्रशिक्षक आणि गायक डॉ. स्नेहाशिष दास आपल्या मनमोहक स्वरांनी रसिकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. त्यांना साथसंगत म्हणून हार्मोनियमवर श्री. प्रवीण जोंधळेकर, तबल्यावर श्री. विशाल पांडे यांची साथ लाभणार आहे. तसेच सहगायिका म्हणून सौ. सविता पडोळे, सौ. अमृता वाठोडकर आणि श्रीमती मंगला ताई सानप कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
लतादीदींनी भारतीय संगीतविश्वाला दिलेला वारसा जपण्यासाठी आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या स्वरसमारोहाचे आयोजन करण्यात आले असून, संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Follow RNI News Channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VaBPp7rK5cD6X
What's Your Reaction?
Like
0
Dislike
0
Love
0
Funny
0
Angry
0
Sad
0
Wow
0



